HW News Marathi
देश / विदेश

जी 20’ मध्ये मोदी-शी चर्चा होणार नाही: चीन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत व चीनमध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीत होऊ घातलेल्या जी-२० परिषदेमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार नाही, असे चीनकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. सध्या भेटीसाठी योग्य वातावरण नसल्याचे मत चीनने व्यक्त केले आहे.

भारत-भूतान व चीन या देशांच्या सीमारेषा एकत्र येत असलेल्या ठिकाणी भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी व शी यांच्यामध्ये चर्चा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चीनकडून व्यक्त करण्यात आलेल्या या भूमिकेमुळे या अंदाजास पूर्णविराम मिळाला आहे. सिक्कीममधील डोकलाम भागात हद्दीच्या वादातून जवळपास एक महिन्यापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. भारत आणि चीनमधील हा वाद योग्यरीतीने न हाताळल्यास त्याची परिणती युद्धात होऊ शकते, असे चीनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांमधील सैन्य १९६२ नंतर सर्वप्रथमच सर्वाधिक काळ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय जवान दहशतवाद्यांमधील चकमकीत एक जवान शहीद

swarit

गायी चोरल्याच्या संशयावरून प. बंगालमध्ये दोघांची हत्या

News Desk

शरद पवारांनी ९ ट्विट्स करत केंद्रीय कृषिमंत्र्यांना सुनावले!

News Desk