HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानातील हिंदुंच्या विवाहातील अडचणी दूर होणार

प्रतिनिधीक छायाचित्र

  • पाकिस्तानच्या सिनेटने पास केले हिंदु मॅरेज बिल
  • पाकिस्तानातील हिंदुंना मिळणार पहिला पर्सनल लॉ

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिनेट (वरिष्ठ सभागृह) मध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हिंदु मॅरिज बिल शनिवारी मंजूर करण्यात आले. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. त्याचबरोबर पाकिस्तानातील हिंदुंना पहिला पर्सनल लॉ मिळेल. या बिलातील तरतुदींनुसार पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायातील हिंदुंचे विवाह होण्यास मदत होणार आहे.

हिंदु मॅरेज बिलाचा प्रवास

1) हिंदु मॅरेज बिल-2017 हे 17 जानेवारीला सिनेटमध्ये सादर करण्यात आले होते. त्याला हिंदु कम्युनिटीज पर्सनल लॉ नाव देण्यात आले होते.

2) 26 सप्टेंबर 2015 ला लोअर हाऊस म्हणजेच नॅशनल असेंबलीत हे बिल आधीच पास करण्यात आलेले आहे.

3) या बिलाचे कायद्यात रुपांतर होण्यात आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सहीसाठी हे बिल राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. त्यानंतर बिलाचे कायद्यात रुपांतर होईल.

– ‘डॉन’च्या वृत्तानुसार बिलमध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदुंना मान्यता देण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे यात त्यांचे विवाह, रजिस्ट्रेशन आणि वयाचा उल्लेख करण्यात आला आहे.

– हिंदु मॅरेज बिलमध्ये मुले आणि मुली दोघांसाठीही लग्नाचे किमान वय 18 ठरवण्यात आले आहे.

– बिलनुसार हिंदु मुलींना आता लग्नाचा कायदेशीर पुरावा मिळू शकेल.

पाकिस्तानातल्या हिंदुंसाठी पहिला कायदा

– राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर हिंदु मॅरेज बिल, हे पाकिस्तानी हिंदुंसाठी पहिला पर्सनल लॉ असेल.

– पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात याची अंमलबजावणी होणार आहे.

– सिंध प्रांतात आधीपासूनच त्यांचा हिंदु मॅरेज अॅक्ट लागू केलेला आहे.

– सिनेटमध्ये पाकिस्तानचे कायदेमंत्री जाहीद हमीद यांनी बिल सादर केले.

– सिनेटच्या मानवाधिकार समितीने 2 जानेवारीलाच बिल बहुमताने पास केले होते.

हिंदु मॅरेज अँक्टला विरोध

– जम्यत-ए-इस्लाम-फज्लचे सिनेटर मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी या बिलाला विरोध केला. या बिलामुळे घटनेत मोठा बदल करावा लागेल, असे ते म्हणाले.

– मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (MQM) च्या सिनेटर नसरीन जलील म्हणाल्या, हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे केवळ मुस्लीम सिंद्धांताच्या नव्हे तर मानवाधिकारांच्याही विरोधी आहे.

– आपण पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदुंसाठी पर्सनल लॉ तयार करू शकत नाही, असे ते म्हणाले.

हिंदु तरुणींच्या विवाहातील अडचणी

– पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे खासदार रमेश कुमार वंकवानी यांच्यामते नवीन कायदा बळजबरी धर्म परिवर्तनावर बंदी आणेल आणि हिंदुंच्या विवाहांना कायदेशीर मान्यता मिळेल.

– रमेश अनेक वर्षांपासून पाकिस्तानात हिंदु मॅरेज लॉसाठी काम करत आहेत. आतापर्यंत पाकिस्तानात हिंदु तरुणींना स्वतःला विवाहित असणे सिद्ध करणे कठीण जात होते. या कायद्यानंतर आता हिंदुंच्या विवाहाची देखिल नोंदणी होईल, असे रमेश यांना वाटते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहिती नाही !

News Desk

‘उत्तर प्रदेशात शीर कापून आणणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस’

Gauri Tilekar

भारतीय लष्करातील महिला कर्नलला ब्लॅकमेल प्रकरणी आयएसआय एजंटला अटक

News Desk