HW News Marathi
देश / विदेश

पुंछ भागात जवानासह पत्नीचा मृत्यू

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानकडून सिमेवर वारंवार शस्रसंधीचे उल्लंघन होत असून शनिवारी सकाळी दहशतवाद्यांच्यातोफगोळ्याच्या हल्ल्यात एका जवानासह त्याच्या पत्नीला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात या दाम्पत्याचे तीन मुलेही जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर पूंछ भागात हा प्रकार घडला.

सीमेपलिकडून पाकिस्तीनी सैन्याने भारतीय हद्दीतील नागरी भागात शनिवारी सकाळी तोफा डागल्या त्याचबरोबर काही लहान शस्त्रे आणि स्वयंचलित शस्त्रांतून गोळीबारही केला. प्रादेशिक सेनेचे जवान मोहम्मद शौकत आणि त्यांची पत्नी साफिया बी हे सीमेजवळच्या करमरा या गावातील त्यांच्या घरात असताना थेट घरावर येऊन पडलेल्या १२० मीमी व्यासाच्या तोफगोळ्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत जवान हा दीर्घ सुट्टीवर आपल्या घरी आला होता. तोफगोळ्याच्या हल्ल्यात या दाम्पत्याच्या रुबीना कौसर (वय १२), झायदा कौसर (वय ६) या दोन मुलींसह आणखी एक नाझीया बी या मुलीसह तीन जणी जखमी झाल्या आहेत. या जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दत्तात्रय होसबोळेंची संघ सरकार्यवाहपदी निवड

News Desk

कुलगाममध्ये सुरु असलेल्या चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

सनी लिओनीकडे पॉर्नस्टार म्हणूनचं का पाहिले जाते | हार्दिक पटेल 

News Desk