नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदरवर्षीप्रमाणे यंदा ही सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
जम्मू काश्मीरच्या सीमेवर तैनात असलेल्या रोजौरीतील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातानी जवानांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Anecdotes about the courage of our soldiers are widely shared but do you also know about the stupendous efforts of our armed forces during natural disasters? Their swift action saves many lives and prevents public property from being destroyed. pic.twitter.com/yKRm6dMUwI
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2019
राजोरी येथे दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवरील जवानांशी देखील संवाद साधला. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दिली.
पंतप्रधान मोदी जवानांसोबत गेली ५ वर्षे दिवाळी साजरी करत आहे. जवानांनाच ते आपले कुटुंब मानत असल्याने दरवर्षी ते सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. गेल्या वर्षी मोदी यांनी उत्तराखंडमधील भारत आणि चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.