HW News Marathi
देश / विदेश

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

मुंबई | प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन आज (१७ ऑगस्ट) झाले आहे. न्यूजर्सी येथे त्यांचे निधन झाले आहे. काल (१६ ऑगस्ट) रात्री त्यांना श्वसनाचा थोडा त्रास होत होता. शास्त्रीय संगीतात त्यांनी एक इतिहासच रचला होता. त्यांच्या जाण्याने संगीतात पोकळी निर्माण झाली आहे.

पं. जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला संशयित …..

Arati More

बोर्डात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला!

News Desk

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk