HW News Marathi
देश / विदेश

पासपोर्टसाठी जन्माच्या दाखल्याची गरज नाही

नवी दिल्ली: पासपोर्ट काढण्यासाठी यापुढे जन्मदाखल्याची गरज भासणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्र सरकाने केली. यामुळे पासपोर्टधारकांची मोठी गैरसोय टळणार आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅनकार्ड किंवा आधारकार्ड गृहित धरेल जाणार आहे.

पासपोर्ट नियम 1980नुसार 26.01.1989 नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना पासपोर्टसाठी जन्माचा दाखला देणे सक्तिचे होते. परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. ते जन्म तारखेसाठी शाळेचा दाखला, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र,एलआयसी पॉलिसी बॉण्ड या कागदपत्रांपैकी कोणतंही एक कागदपत्र सादर करु शकतात. तर सरकारी कर्मचारी हे सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड हे देखील सादर करु शकतात. संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय नेते!

News Desk

उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला..

Arati More

विकासासाठी राज्य-केंद्र अशा दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असावं! – पंतप्रधान मोदी

News Desk