HW News Marathi
देश / विदेश

भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांचा “मलबार 2017′ नौदल सराव सुरू

https://youtu.be/qfX26rr7qEc

चेन्नई – लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांचा “मलबार 2017′ हा नौदल सराव आजपासून (सोमवार) सुरू झाला.

हा नौदल सराव बंगालच्या उपसागरात होत आहे. या सरावामध्ये अमेरिकेच्या पाच युद्धनौका, पोसेडॉन लढाऊ विमान आणि एक पाणबुडी यांनी, तर जपानच्या दोन युद्धनौकांनी सहभाग घेतला आहे. भारतातर्फे आयएनएस जलाश्‍व आणि आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौका सरावात भाग घेतील.

अमेरिका, भारत आणि जपान या तीन देशांचा हा 21 वा संयुक्त सराव आहे. एकमेकांच्या सहकायार्ने टेहेळणी, बचाव आणि हल्ला यांचा सराव या वेळी केला जाणार आहे. याशिवाय, वैद्यकीय मदत, शस्त्रसाठा पुरविणे, हेलिकॉप्टर कारवाई यांचा सरावही केला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनेने दुधात विष मिसळलं. सासरकडील १३ जणांचा मृत्यू

News Desk

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

News Desk

गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईंची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक

News Desk