HW News Marathi
देश / विदेश

भारत- चीनचे सैन्य भिडले

नवी दिल्ली : भारत- चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तयार झालेला तणाव अद्याप काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता तर दोन्ही देशांचे सैन्य थेट आमने सामनेच आले आहे. भारतीय जवान आणि चिनी सैनिक एकमेकांपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर तैनात करण्यात आले आहेत.

भूतानच्या डोक्लाम भागावरुन चीन आणि भारतामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून भारतीय सैन्यावर मागे हटण्यासाठी दबाव आणण्यात येतो आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे स्पष्ट संकेत भारतीय सैन्याकडून देण्यात आले आहेत.

भारताने प्रथमच भूतानच्या भूभागावरून प्रथमच अतिशय ठाम भूमिका घेतली आहे. याआधी १९८६ मध्ये सुंदरम प्रांतावरून दोन्ही देशांचे सैन्य सर्वाधिक काळ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जवळपास महिन्याभरापासून तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल २६ जुलैला चीनला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित डोवाल चीनच्या सुरक्षा सल्लागारांची भेट घेणार आहेत.

डोवाल ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी चीनला जाणार आहेत. बीजिंगमध्येही या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि चीनमधील तणाव कमी होण्याची शक्यता नसल्याने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. डोक्लाममधील प्रकरण भारताकडून योजनाबद्ध पद्धतीने हाताळले जात आहे. संसदेमध्ये विरोधी पक्षाकडून हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. भारताकडून याप्रकरणी फक्त परराष्ट्र मंत्रालयाकडून याबद्दल भाष्य करण्यात येणार आहे. याआधी चीनकडून विविध विधाने करण्यात आल्यानंतर याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते.‘जोपर्यंत भारत डोक्लाममधून सैन्य मागे घेणार नाही, तोपर्यंत कोणतीही बातचीत होणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा चीनकडून घेण्यात आला आहे. मात्र चीनच्या धमक्यांना भीक न घालता भारतीय सैन्याने डोक्लाममधील मुक्काम कायम ठेवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपारा येथे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

News Desk

अंगणवाडी कर्मचारी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम

News Desk

“भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं बाबासाहेबांना देखील वाटलं नसेल”- हसन मुश्रीफ

News Desk