HW News Marathi
देश / विदेश

मुख्यमंत्री पलाणीस्वामींनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

अजय कल्याणे

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वामी

 

  • 122 आमदारांचं पलाणीस्वामींना समर्थन

चेन्नई – नाट्यपूर्ण घडामोडीनंतर अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के. पळनीस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, १२२ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने तर ११ आमदारांनी विरोधात मतदान केले. हे ११ आमदार पनीरसेल्वम गटाचे होते.

गुप्त मतदानाच्या मागणीसाठी सकाळपासून सभागृहात गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी द्रमुकचे ८८ आमदार तर IUML पक्षाचे १ अशा एकूण ८९ आमदारांना सभागृहाबाहेर काढले तर काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यामुळे सभागृहात मतदानाच्या वेळी केवळ शशिकला गटाचे आणि पनीरसेल्वम गटाचे आमदार उपस्थित होते.

शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर तुरुंगात रवानगी होण्यापूर्वी त्यांनी आपले समर्थक आमदार पळणीस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. राज्यपालांनी पळणीस्वामी यांना विश्वासदर्शक मतांसाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, २ दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जाणार होते. पण ते गुप्त मतदान पद्धतीने घेतले जावे या मागणीसाठी विरोधीपक्षातील आमदारांनी आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासूनच सभागृहात गोंधळ घातला. खुर्च्यांची, माईकची मोडतोड केली. परिणामी अध्यक्षांनी आधी १ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर मतदान घेण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रद्द केलेल्या तिकीटमधून रेल्वेची १४०० कोटींची बेगमी

News Desk

‘महिलांचा आदर ते प्रसारमाध्यमांना सल्ला’, तालिबानची पहिली पत्रकार परिषद

News Desk

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk