HW News Marathi
देश / विदेश

‘महिलांचा आदर ते प्रसारमाध्यमांना सल्ला’, तालिबानची पहिली पत्रकार परिषद

काबुल | तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यावर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी काबुल मध्ये कोणते नवीन नियम लागू करणार या बाबत माहिती दिली आहे. पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली होती.

तालिबानच्या पहिली पत्रकार परिषद

तालिबान्यांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद घेतली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची महिलांच्या बाबतीत असलेल्या चिंतेबाबत आपली भूमिका मांडली. तालिबानने मंगळवारी इस्लामिक कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना माफी जाहीर केली आहे. तालिबानने अफगाणिस्तान सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की, संघटनेची सैनिकांना कोणाचाही सूड घ्यायचा नाही आणि सर्वांना माफ करण्यात आले आहे.

अफगाणिस्तान सुरक्षित करू

तालिबानने पत्रकार परिषद घेऊन नवीन नियमांबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी वचन दिले की तालिबान अफगाणिस्तान सुरक्षित करतील. त्यांनी असेही म्हटले की ज्या लोकांनी मागील सरकारसोबत किंवा परदेशी सरकार किंवा सैन्याबरोबर काम केले त्यांच्यावर कोणताही सूड उगवायचा नाही. आम्हाला इतर देशांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत.

त्याच्या पहिल्या पत्रकार परिषदेत, तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले: ‘आम्ही खात्री देतो की कोणीही त्यांच्या दारात जाऊन त्यांनी मदत का केली हे विचारणार नाही.’ त्याआधी तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इमानुल्ला सामंगानी यांनी महिलांना सरकारमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करेल असे वचन दिले होते.

परदेशी नागरिकांना कोणताच त्रास होणार नाही

तालिबानच्या दहशतीमुळे काबुल मधले परदेशी नागरिक घाबरून गेले आहेत. तालिबानने या नागरिकांना न घाबरणाच्या सल्ला दिला आहे व तुम्हाला काही करणार नाही असं आश्वासन देखील दिलं आहे. महिलांना इस्लामिक कायद्यानुसार अधिकार दिले जातील, असे सांगून मुजाहिद यांनी अनेक अफगाणिस्तान आणि परदेशी नागरिकांच्या प्रमुख चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीएसई बारावीचा आज निकाल

News Desk

मैत्रिणीवर बलात्कार करून, व्हिडीओ केला व्हायरल

News Desk

कुमारस्वामी सरकारला १८ जुलैला बहुमत सिद्ध करावे लागणार

News Desk