HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून सीआरपीएफचे जवान शांत आहेत

 

श्रीनगर – देशाचे रक्षणकर्ते असल्याने देशातल्याच नागरिकांना हात न लावण्याची शिकवण जवानांना दिली जाते, त्यामुळं जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांशी फुटीरतावाद्यांनी गैरवर्तन करूनही जवानांनी संयम पाळला. सध्या जवानांच्या या धीरोदात्तपणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काश्मीरचे फुटीरतवादी सीआरपीएफच्या जवानांशी करत असलेलं गैरवर्तन पाहून प्रत्येक भारतीयाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. 9 एप्रिलचा काश्मीरच्या पुलवामा भागातील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतं आहे. विशेष म्हणजे एवढा अपमान सहन करुनही हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत आहेत. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीत. कारण दुश्मनाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलकडून अनोखी मानवंदना, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल

News Desk

मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन

News Desk

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

News Desk