HW News Marathi
देश / विदेश

व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा, स्मृती इराणी यांच्याकडे पदाभार

नवी दिल्लीः एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर सोमवारी शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या मंत्रालयाचा पदाभार नरेंद्र तोमर व स्मृती इराणी यांच्याकडे सोपावण्यात आला आहे. दरम्यान, नाडयू मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची लढत संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी होणार आहे. यामध्ये नायडू यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; संपूर्ण देशाचे लक्ष

Aprna

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk

मराठा आरक्षणावर दानवेंचा क्लास लावू, राऊतांचा दानवेंवर घणाघात

swarit