HW News Marathi
देश / विदेश

शंकरसिंह वाघेला यांची कॉँग्रेसमधून हकालपट्टी

नवी दिल्लीः राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गुजरातमधून मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आलीआहे. दरम्यान, मतमोजणीपूर्वीच म्हणजे 24 तासांपूर्वीच आपले पक्षाने निलंबन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडीतून कॉँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

‘माझ्या पक्षाने मला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माझे नाव शंकरसिंह आहे. भगवान शंकराप्रमाणेच मीदेखील विष प्राशन करू शकतो. मी आता ७७ वर्षांचा आहे. मात्र, मी राजकारण सोडणार नाही. बंड करणे माझ्या रक्तात आहे. माझे किती नुकसान होईल, याची मला फिकीर नाही. मात्र अन्याय होताना बघ्याची भूमिका घेणार नाही,’ असे शंकरसिंह वाघेला यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

काल (गुरुवारी) झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गुजरातमूधन क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले आहे. एनडीएचे उमेदवार असलेल्या रामनाथ कोविंद यांना गुजरातमधून अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट झाली हे उघड आहे. आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या असताना आता शंकरसिंह वाघेला यांच्या बंडामुळे त्यात मोठी भर पडली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल करारावरून संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

News Desk

आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?

News Desk

इम्रान खान आज पाकिस्तानच्या २२ व्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार

News Desk