HW News Marathi
देश / विदेश

शंभर वर्षापासून येथे रंगते म्हैशीची शर्यत

वृत्तसंस्थाः आपल्याकडे दिवाळीनंतर रेड्यांच्या टकरीचा खेळ खेळला जातो. परंतु थायलंडमध्ये गेल्या शंभर वर्षांपासून म्हैशींची धावण्याची स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा पाहण्यासाठी येथील नागरिक मोठी गर्दी करतात. आपल्याप्रमाणे येथे म्हैशीचा शेतीच्या कामासाठी वापर केला जातो. परंतु थायलंडमध्ये म्हैशीची स्पर्धा घेताना त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जपान इंटरनॅशनल को. एजन्सीने राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna

काँग्रेस नेत्यांचं ट्विटर अकाऊंट ‘लॉक, काँग्रेस नेते म्हणतात, ‘आम्ही लढत राहू!’

News Desk

जम्मू-कश्मीरमच्या कुलगाममध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk
देश / विदेश

चीननं खुपसला त्यांच्या नोबेल विजेत्याच्या पाठीत खंजीर

News Desk

मुंबई : मानवतावादी कार्यासाठी जागतिक स्तरावरील मानाचा नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या लिऊ शियाबाओ या लोकशाहीवादी चीनी नेत्याच्या पाठीत चीननेच खंजीर खुपसला आहे. तुरुंगात खितपत त्यांचा वयाच्या ६१ व्या वर्षी गुरुवारी यांच्या मृत्यू झाला. कर्करोगाने गंभीर आजारी असूनही त्यांना चीनी सरकारने तुरुंगात डांबून ठेवले होते.

दरम्यान, शेवटचे दिवस त्यांना मुक्ततेत आणि परदेशात जगू द्यावेत,ही त्यांची विनंती चीनने वारंवार फेटाळली होती. त्यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांचा आजार अंतिम टप्प्यात होता. गेला महिनाभर त्यांना कडेकोट बंदोबस्तात तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. चायना मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे निधन झाल्याची घोषणा शेनयांगच्या लीगल ब्युरोने वेबसाइटवर केली.

लोकशाहीचे खंदे समर्थक असलेल्या शियाबाओ यांनी गेली अनेक दशके सातत्याने चीनमधील सरकारी दडपशाहीविरोधात आवाज उठवला. त्यामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. आपल्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी चीन कसा करतो,याचे ते जिवंत उदाहरण बनले होते.

लिऊ यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांना उपचारांसाठी परदेशांत पाठवावे आणि मुक्त करावे, अशी विनंती मानवाधिकार क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय संघटना, पाश्चात्त्य देश तसेच काही स्थानिक कार्यकर्त्यानी केली होती. जर्मनी आणि अमेरिकेने त्यांना मानवतेच्या भूमिकेतून घेऊन जाण्याची तयारीही दाखवली होती.

डिसेंबर २००९ मध्ये त्यांना तुरुंगवासात पाठविण्यात आले. त्यांना २०१० मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यावेळी ओस्लोमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. बीजिंगमधील तिआनमेन चौकात १९८९ मध्ये झालेल्या निदर्शनांतही लिऊ यांनी भाग घेतला होता.

 

Related posts

#InternationalYogaDay : कोरोनाला हरवायचे असेल तर योग आवश्यक | पंतप्रधान मोदी

News Desk

फेसबुक डेटा लिक प्रकरणी केंब्रिज एनालिटिका कंपनी बंद

swarit

गुलाम नबी आझाद यांच्या कार्याला उजाळा देत शरद पवारांनी सांगितला एक किस्सा

News Desk