HW News Marathi
देश / विदेश

शालेय मुलीची छेड काढणारा सीआरपीएफ जवान अटकेत

रायपूर – छत्तीसगढमधील दांतेवाडा जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला अटक केली आहे. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी पीडितेशी अश्लील वर्तन करण्यात आले होते. याप्रकरणी आणखी एक जवानही पोलिसांच्या रडारवर आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आणि कार्यक्रमाच्य छायाचित्रांवरून दोन जवान या कुकृत्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून बुधवारी त्यापैकी शमीम अहमद (३१) याला अटक करण्यात आली आहे. तो सीआरपीएफच्या २३१ व्या बटालियनमध्ये तैनात होता. स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला कोठडी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणातील जमिनीसंदर्भात केंद्राच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

News Desk

एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरणार

News Desk

जागतिक आदिवासी दिनानिमित्त थोडक्यात…

News Desk