HW News Marathi
देश / विदेश

१२ लाख कोटींच्या नवीन नोटा चलनात- अर्थ मंत्री , अरुण जेटली

शुभम देशमाने

दिल्ली – सध्या देशात बारा लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक नवीन नोटा चलनात असल्याची माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज लोकसभेत दिली. नोटबंदीवरील चर्चेदरम्यान जेटली बोलत होते.

नोटबंदीनंतर रिजर्व्ह बँकेने मोठया प्रमाणात पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या. रिजर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकेडवारीनुसार २४ फेब्रवारीपर्यत अकरा लाख चौसष्ट हजार शंभर कोटी रूपयांच्या नोटा चलनात आहेत. ही आकडेवारी 8 नोंव्हेबरला नोटबंदी जाहीर झाल्यानंतर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नेमक्या किती नोटा बँकेत जमा झाल्या आहेत हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. कारण जमा झालेली प्रत्येक नोट ही खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी वेळ लागत आहे, त्यामुळे जुन्या जमा झालेल्या नोटांची आकडेवारी जाहीर करायला वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…’या’ कर्तृत्वान महिलेने पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून केले पहिले ट्वीट

swarit

नोटबंदीतून किती काळा पैसा आला याची माहीती नाही, आरबीआयचा संसदीय समितीला अहवाल सादर

News Desk

पाकला दणका, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर २००% कस्टम ड्युटीत वाढ

News Desk