HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत उद्या शरद पवारांनी बोलावली बैठक,१५ पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. काल (२० जून) ते दिल्लीला गेले होते. दरम्यान, आज (२१ जून) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच शरद पवार यांनी उद्या मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावलीa आहे. या बैठकीला १५ पक्षांचे नेते सामील होणार आहेत. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, शरद पवारांनी उद्या (२२ जून) विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचं वृत्त आहे. उद्या मंगळवारी दुपारी 4 वाजता पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला १५राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk

शेतकरी नेत्यांची आज बैठक होणार, आंदोलनावर तोडगा निघणार?

News Desk

काळ्या पैशाची माहिती देण्यास ‘पीएमओ’चा नकार

News Desk