HW News Marathi
देश / विदेश

1 मे नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या लाल दिवा काढणार

बंगळुरू – केंद्र सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींच्या वाहनावरील लाल दिव्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी एक मे पासून लागू होणार आहे. अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांनी 1 मे ची वाट न पाहताच आपल्या वाहनांवरील लाल दिवे काढलेले आहेत. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लाल दिव्याचा मोह सुटत नसल्याचे दिसत असून “एक मे पूर्वी मी लाल दिवा का काढू?’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “मी आताच लाल दिवा का काढावा? तो एक मे पासून काढण्यात येईल. ज्यावेळी आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल त्यावेळी मी दिवा काढून टाकेल.’ अशाच प्रकारची प्रतिक्रिया कर्नाटकमधील कायदा मंत्री टी. बी. जयचंद्रा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “कॅबिनेटने असा निर्णय घेतला हे खरे आहे. या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठी अंमलबजावणीचे आदेश काढायला हवेत. हे प्रकरण केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. केवळ कॅबिनेटने निर्णय घेतला असून दुसरे काहीही घडलेले नाही. लाल दिवा हटविण्यासाठी एक मे ही मुदत आहे. केवळ आदेश आल्यानंतरच दिवा हटविण्याचा आग्रह धरायला हवा, अशी पुष्टीही सिद्धरामय्या यांनी जोडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे अलाहाबाद मध्ये दंगल

News Desk

निवडणुकीतील अपयशामुळे सोनिया गांधी नाराज,कोरोना परिस्थितीवरून मोदींवरही बरसल्या !

News Desk

४५३ कोटी जमा करा, अन्यथा ३ महिने शिक्षा भोगा | सर्वोच्च न्यायालय

News Desk