HW News Marathi
देश / विदेश

१०१ वर्षाच्या वयोवृद्ध कोरोनावर मात करुन सुखरुप घरी गेले

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या विळख्यातून इतक्यात तरी देशाची सुटका होईल की नाही असे चित्र दिसत नाही आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ३० हजारांहून अनेकांनी जीव गमावले आहे. कोरोनाची लागण होण्याचा धोका लहान मुले आणि वृद्धांमध्ये अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची लागण झाल्याने वृद्ध माणसे दगावण्याची जास्त चिन्हे आहेत मात्र, हा शिक्का पूसत १०१ वर्षीय वृद्धाने कोरोनावर यशस्वी मात केल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

इटलीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या १०१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वृद्धांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असतानाही अशाप्रकारे कोरोनावर यशस्वी मात करणारे, ते सर्वात वृद्ध व्यक्ती ठरले आहेत. १०१ वर्षीय श्री. पी, यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना रिमिनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारानंतर आता ते बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती इटालियन माध्यमांनी दिली. त्यामूळे, जर वयोवृद्ध रुग्ण बरे होऊन घरी जात असतील तर सामान्य माणसेही त्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर नक्कीच मात करु शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल

News Desk

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

News Desk

फॉक्सवॅगनमुळे देशाच्या पर्यावरणाचे नुकसान, ठोठावला ५०० कोटींचा दंड

News Desk