HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडूत पोलिसांच्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू

चेन्नई | तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. सध्या या ठिकाणी आंदोलन तीव्र झाल्याची माहिती मिळत आहे. अकरा आंदोलकांचा मृत्यू झाल्यामुळे आंदोलन अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे.

आंदोलना दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. कंपनीच्या विस्ताराचे वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आले आहे. या आंदोलनाला मंगळवारी अचानक हिंसक वळण लागले आणि यामध्ये अकरा आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत

गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहिर केली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जाणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छोटा राजनसह चौघांना सात वर्षांचा कारावास

News Desk

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याचे कार्यालय उध्वस्त

Gauri Tilekar

बँक कर्मचारी आज देशव्यापी संपावर

News Desk