HW News Marathi
राजकारण

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटणार

बंगळुरू | जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथ विधी सोहळा दुपारी ४.३० वाजता विधानसेचा प्रांगणात होणार आहे. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. काँगेसच्या वाटेला २२ मंत्रिपदे तर जेडीएसच्या वाटेला मुखमंत्रीसह एकूण१२ मंत्रिपदे येणार आहे. या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

अनेक अडचणीचा सामना करत काँग्रेस-जेडीएस युती झाली. असून अनुकूल-प्रतिकूल असणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना मी निमंत्रण दिले आहे. सर्व लोकशाही व धर्मनिरपेक्ष शक्तींनी भाजपाविरोधात एकत्र येण्याचे व्यासपीठ यावे.या दृष्टीने सोहळ्याकडे पाहिले जाणार आहे. भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचा सशक्त संदेश यातून जाईल. दिला जाणार असल्याचे जेडीएसचे एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.

  • शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मुख्यमंत्री आणि बड्या नेतेमंडळीची हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, बहुजन समाज पार्टीच्या मायावती, आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (तेलगु देसम), पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माजी मुख्यमंत्री ओमन चांडी या शपथ विधी सोहळ्याला येणार आहेत.

तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव, आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंतो (आसाम गण परिषद), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, अभिनेते कमल हासन व रजनीकांत इत्यादींना शपथविधी सोहळ्याला निमंत्रित केले असून हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेना बंडखोरांनी नव्हे, तर भाजपने फोडली,” उद्धव ठाकरेंचा आरोप

Aprna

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

Aprna

चोराच्या उलट्या बोंबा

swarit