गांधीनगर | गुजरातमधील गीर जंगलामध्ये गेल्या ११ दिवसांत ११ सिंहाचा मृत्यू झाला आहे. या सिंहांचा मृत्यू फुफ्फुस आणि यकृताच्या संसर्गाने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी दिली आहे.
Junagadh: 11 lions have died in Gir forest in the past 11 days.H Vamja, veterinary officer says,'all of them have died due to lung infection. Cause of infection isn't known as yet. We're giving preventive medicines to other lions so that they don't get affected' #Gujarat(20.9.18) pic.twitter.com/pHL44DXqjQ
— ANI (@ANI) September 20, 2018
११ सिंहाचा मृत्यू फुफ्फुसाच्या संसर्गाने झाला आहे, परंतु या संसर्गाचे नेमके कारण काय याचा अजून उलघडा झाला नसल्याची माहिती पशू चिकित्सक अधिकारी एच.वमजा यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे काही सिंहाचा मृत्यू एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या संसर्गाची लागण इतर सिंहाना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
वनाधिकाऱ्यांनी मृत सिंहांच्या व्हिसेराचे नमुने जुनागढच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात सिंहांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गुजरातमधील गीर जंगल हे आशियातून लुप्त होणाऱ्या सिंहांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या जंगलात तब्बल ५२० सिंह आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.