गुजरात | गुजरातमधील सुरतमध्ये आज (१९ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. रात्री सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी १३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.
भरदाव ट्रकने फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं आहे. यातल्या १३ मजूरांचा मृत्यू झाला आहे. सूरतच्या किम चार रस्ता परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले सगळे मजूर राजस्थानच्या बन्सवारा जिल्ह्यातील आहेत. रात्री फूटपाथवर झोपलेले असताना ऊसाचा ट्रॅक्टर आणि एका ट्रकची धडक झाली. यामध्ये ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे ट्रक फूटपाथवर आला, आणि फूटपाथवर झोपलेली १८ लोकं चिरडली गेली.
Gujarat: 13 people died after they were run over by a truck in Kosamba, Surat.
Police says, "All the deceased are labourers and they hail from Rajasthan." pic.twitter.com/E9uwZnrgeO
— ANI (@ANI) January 19, 2021
१८ जणांपैकी १३ जणांचा मृत्यू जागच्याजागीच झाला, यानंतर सगळ्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत, या सगळ्यांना स्विमेर रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
Ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the accident in Surat. Rs. 50,000 each would be given to those injured.
— PMO India (@PMOIndia) January 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.