HW News Marathi
महाराष्ट्र

कोण होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष? कोणाच्या  नावाची लागणार वर्णी

नागपुर | काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबत चालू आहेत. अशातच काँग्रसचे खासदार बाळू धानोरकर यांनी विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष हवा. विदर्भात पक्षाला मोठा स्कोप आहे. त्यामुळे काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा, अशी आग्रही मागणी बाळू धानोरकर यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात विदर्भातचांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे धानोरकरांनी प्रदेशाध्यक्षपदावर विदर्भाची दावेदारी केली आहे. विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर हे नेते विदर्भात आहेत.दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष ओबीसी समाजातून झाल्यास आनंदच होईल, असं बाळू धानोरकर म्हणाले. त्यामुळे धानोकरांचा बोलण्याचा रोख हा वडेट्टीवारांकडे होता हो दिसून येत आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांच्या नावाची वर्णी लागणार असे म्हटले जात आहे. आता नक्की कोण प्रदेशाध्यक्ष होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दोन शिवसैनिकांची भेट’, भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले…..

Jui Jadhav

जेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

News Desk

“कुठे गेले पाटील?” चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना सवाल…!

News Desk