HW News Marathi
देश / विदेश

१५ वर्षाच्या पत्नीसोबत सेक्स ठरणार बलात्कार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सज्ञान नसलेल्या पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कारच, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे यापुढे अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार समजला जाईल. यासोबतच सज्ञान व्यक्तीसाठीची १८ वर्षांची मर्यादा कमी केली जाऊ शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

पतीने १५ ते १८ वर्षांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार समजण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात नमूद केले. सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचे वय कमी केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवल्यास तिला याबद्दलची तक्रार वर्षभरात दाखल करावी लागेल. न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देताना बालविवाहाच्या प्रथेबद्दल चिंता व्यक्त केली. ह्यसामाजिक न्यायासंबंधीचे कायदे ज्या भावनेने तयार केले जातात, त्या भावनेने ते लागू केले जात नाहीत, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने नाराजी प्रकट केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षलवाद्यांनी घडवून आणला भूसुरुंगाचा स्फोट, ६ जवान शहीद तर १० जखमी

News Desk

राज्यातील ३९ रुग्णांना डिस्चार्ज, तर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० वर

swarit

नवीन संसद भवनाच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती   

News Desk