HW Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

रायपूर | छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (५ एप्रिल) पहाटे पुन्हा एकदा चकमक झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद तर एक जवान जखमी झालेल्याची माहिती मिळाली आहे. ही चकमक छत्तीसगडमधील धमतरी परिसरात झाली.

छत्तीसगडमध्ये काल (४ एप्रिल) कांकेर येथे सीआरपीएफचे आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना पखांजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सामान्य लोकांना धमक्या दिल्या जात आहे. पंखाजूर भागात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.

 

Related posts

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार

News Desk

सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणाची १० जानेवारीला सुनावणी

News Desk

Section 377 | समलैंगिकता गुन्हा नाही – सर्वोच्च न्यायालय

News Desk