HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील पूंछ, राजौरी जिल्ह्यात उभारणार प्रत्येकी २०० बंकर्स

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले गेले. त्यानंतर भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरघोड्या काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. परिणामी, गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड गोळीबाराचा सामना करावा लागलेल्या पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात अतिरिक्त बंकर उभारण्यास आता जम्मू-काश्मीर प्रशासनाने परवानगी दिली आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सामान्य स्थानिक नागरिकांना कोणतीही हानी पोहोचू यासाठी पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्येकी २०० म्हणजे एकूण ४०० बँकर्स उभारण्यात येणार आहेत. या बॅंकर्सच्या साहाय्याने स्थानिक नागरिक स्वतःचा बचाव करू शकणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या उपायुक्तांकडे यासाठी लागणारा निधी सुपूर्द करण्यात येणार असून त्यानंतर लवकरात लवकर हे बँकर्स उभारण्यात येतील.

Related posts

पाकिस्तानातील हिंदुंच्या विवाहातील अडचणी दूर होणार

News Desk

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूर यांची दुबई पोलिसांकडून चौकशी

News Desk

रक्षाबंधनाला शौचालयाची भेट

News Desk