नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता. यानंतर याचिकेवर काल (१६ जानेवारी) सुनावणी करताना पटियाला हाऊस न्यायालयाने फाशीच्या निर्णयाला ‘स्टे’ दिला आहे. यामुळे निर्भयाच्या आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी दिली जाणार नाही. यामुळे आता फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरेल. तुरुंग प्रशासनाने आज (१७ जानेवारी)पर्यंत न्यायालयाला स्टेटस रिपोर्ट द्यायचा आहे.
2012 Delhi gangrape: Delhi Court directs Tihar jail authorities to file proper report by Jan 17 about status of scheduled execution of convicts. Directions passed after jail authorities informed, they wrote to Delhi govt on issue of scheduled execution in view of pending remedies
— ANI (@ANI) January 16, 2020
दिल्ली तुरुंगाच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर नियमांनुसार दोषींना १४ दिवसांचा अवधी मिळतो. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली तरीही नव्याने डेथ वॉरंट जारी करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी नवीन वॉरंटसाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.
गेल्याच आठवड्यात दोषी अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) यांचे डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या दोन्ही आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर मंगळवारी (१४ जानेवारी) न्यायालयात न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने एकमताने आरोपींची याचिका फेटाळून लावली.
१६ डिसेंबरची ती काळरात्र
१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.