HW News Marathi
देश / विदेश

‘पेढेवाले मोदी’ म्हणणारे आणि आता इंदिराजीसुद्धा भाजपला प्रिय वाटतात, आनंद आहे…..सामनातुन टिका

मुंबई | ‘बाटग्यांची जी उठाठेव सुरू आहे ती फक्त विरोधासाठी विरोध’ म्हणुन अशा तिखट शब्दांत आजच्या सामनाच्या अग्रलेखातुन इंदिरा गांधी वादावरून भाजपवर टिका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलयं की , “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्वास पेढेवाले वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजुने संपुर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे”, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर करण्यात आली आहे

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी इंदिरा गांधी या कुख्यात गुंड करीम लालाल भेटायला यायच्या असा खुलासा केला आणि त्यानंतर एकचं वादंग निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर राऊतांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं. मात्र, भाजप नेत्यांनी हा मुद्दा रेटून धरला. इतकंच नाही तर काँग्रेसचं इंदिरा गांधींवरील प्रेम कमी झालं असेल, पण आमचं नाही, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं. त्यावरुन भाजपवर आज ‘सामना’च्या अग्रलेखात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं.

“इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच. शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधीचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनुन मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना कधी इंदिरा गांधीचा. तुर्त इतके पुरे”, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.

“भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे आम्ही म्हणतो, ते कीती खरे आहे, याचे प्रत्यंतर आपल्या कृतीतून तो रोज देत आहेत. मुळ भाजप राहिला बाजुला पण भाजपात घुसलेल्या इरसाल “बाटग्यां”नी उठसूट सिलिंडर र करुन बांग देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. सत्ता हातून सटकल्याने निद्रानाशाचा रोग जडला हे समजु शकतो पण त्या निद्रानाशातुन त्यांना जे झटके व आचके येत आहेत, त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत. इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्रच्या इतिहासात निर्माण झाला नसेल. पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते तसा काहीसा प्रकार सुरु आहे. सोयीनुसार टोप्या घालण्याचे व बदलण्याचे काम सुरु आहे. मोदी यांची तुलना सातारच्या पेढेवाल्यांशी केली जाते हे जर भाजप नेत्तृवास बिनशर्त मान्य असेल तर प्रश्नच संपतो”, असा घणाघात आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

News Desk

महागाईचा फटका! घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ

Aprna

केरळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

News Desk