HW News Marathi
देश / विदेश

देशातील २२ राज्यातील बळीराजा १ जूनपासून संपावर जाणार

मुंबई | महाराष्ट्रात दोन महिन्यापुर्वी शेतकऱ्यांचा लाँग मोर्चा काढला होता. या मोर्चाने संपुर्ण महाराष्ट्र हदरुन गेला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता देशातील २२ राज्यांतील शेतकरी १ ते १० जून या काळात संपावर जाण्याचा निर्णय राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी संपावर गेल्यानंतर १२८ शहरात भाजीपाला अन्नधान्य, दूध आणि इतर शेतमालाचा पुरवठा बंद ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

देशभरातील ११० शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापन झाली आहे. या महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुराव केला जाणार आहे. २२ राज्यातील १२८ शहरात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. संपाच्या काळात शेतकरी आपला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरांमध्ये विक्रीस पाठविणार नाहीत. आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी देखील करणार नाहीत.

या महासंघाने खबरदारी म्हणून ज्या शहरात संप होणार आहे. ती शहरे वगळून इतर शहरात शेतकरी त्यांचा शेतमाल विक्री करु शकते. हे संपूर्ण आंदोलन अंहिसेच्या मार्गानेच केले जाणार आहे. सरकारने याबाबत काही वेगळी भूमिका घेतली तर निर्माण होण्या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहिल, असे महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच’, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk

#CoronaVirus | पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

News Desk

राज्यात सध्या २ मुख्यमंत्री, अजित पवारांना अपयशी ठरविण्याचे प्रयत्न सुरु !

News Desk
राजकारण

पालघरमध्ये भाजप बिनविरोधी जिंकण्यासाठी नवीन खेळी

News Desk

मुंबई | श्रीनिवास वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, आम्ही त्यांचे पुनर्वसन करु, असा नवीन प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे. मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर अत्याप तरी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी देण्यात येईल,’ असे भाजपने म्हटले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यांची आजची शेवटची तारीख आहे. श्रीनिवास यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केला आहे.

भाजप पालघर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून यासाठी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिली असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांचा लोकसभा उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना ठाणे-पालघर जिह्यात जोरदार प्रचाराल देखील सुरुवात केला आहे. श्रीनिवास याला विजय करण्यासाठी ‘एक मत शिवसेनेला, एक मत चिंतामण वनगा साहेबांना,’ अशी मोहिम शिवसेनेकडून संपूर्ण पालघरमध्ये राबवली जात आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यनंतर पालघरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने वनगा कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

 

 

 

Related posts

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटीची ऑफर | कुमारस्वामी 

News Desk

काँग्रेस नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य, भर कार्यक्रमात पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन

News Desk

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

swarit