मुंबई – ऐन उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर तब्बल तीन तास थांबविण्यात आले होते. त्यामुळे विमानात २३४ प्रवासी अडकून पडले. त्यातच भर म्हणून विमानाची वातानुकूलन यंत्रणाही बंद पडल्यामुळे प्रवाशांना श्वास कोंडलेल्या अवस्थेत घामाघूम होऊन बसावे लागले.
एआय ८०९ हे विमान सकाळी सव्वाअकरा वाजता मुंबईतून दिल्लीस प्रयाण करणार होते. ते अखेर दुपारी अडीचच्या सुमारास हवेत झेपावले. ‘विमानात चढण्याच्या दोन तास आधी आम्ही विमानतळावर आलेलो असतो, त्यात आणखी या बिघाडामुळे आमचे पार हाल झाले,’ असे उद्विग्न प्रवाशांनी सांगितले. विमानास विलंब का झाला, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post