मुंबई । उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या जवळ यमुना एक्स्प्रेस वेवर आज (८जुलै) पहाटे बस नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात २९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५-१६ प्रवासी जखमी झाले आहेत. आतापर्यंत २७ मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
#UPDATE 29 persons dead after a bus carrying around 40 passengers fell into 'jharna nalla' on Yamuna Expressway in Agra. Rescue operation underway. pic.twitter.com/mAnY9pUsgX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 8, 2019
अपघातग्रस्त बस लखनौ येथून दिल्लीच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या यमुना एक्स्प्रेस वे दरम्यान झरना नाल्यात ५० फूट खोलवर कोसळली. या बसमधून सुमारे ५० लोक प्रवास करत होते. ही दुर्घटना घटना एत्मादपूर पोलिस ठाणे हद्दीत घडली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.