नवी दिल्ली येथील दिलशाद गार्डन परिसरात पतीने पत्नीवर 30 वेळा चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला वाचवण्यासाठी आलेल्या मुलावरही चाकूने वार करून गंभीर जखमी केला आहे, जखमी मुलाला जवळच्या रूग्णालायत उपरासाठी दाखल करण्यात आले आहे. आरेपी पती विनोद बिष्टा याला अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
विनोद आणि रेखा यांच्या लग्नाला 16 वर्ष झाली होती. मात्र आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीच्या फोनवर काही मेसेज वाचल्यामुळे त्याचा संशय वाढला होता. एप्रिल महिन्यात त्याने पत्नीला परपुरुषाशी फोनवर बोलताना रंगेहाथ पकडल्याने दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची.
याच संशयातून विनोदने 36 वर्षीय रेखावर सुरीने सपासप वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. आईच्या बचावासाठी मध्ये पडलेल्या 15 वर्षांच्या विनीतच्या हातावरही त्याने वार केले. त्यांचा 7 वर्षांचा धाकटा मुलगा संचित आजोळी गेला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.