HW News Marathi
देश / विदेश

गोव्यात 5.5 इंच पावसाची नोंद

गोवा| मुंबईत मान्सूनचे आगमन शनिवारी झाले असले तरी गोव्यात मात्र शुक्रवारी रात्री पासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 5.5 इंच पावसाची नोंद गोव्यात करण्यात आली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याने जोरदार अतीवृष्टी होणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम एल साहू यांनी म्हटले आहे.

पणजी येथील डॉप्लर रडारवरून टीपलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार कर्नाटक, गोवा व कोंकणच्या आकाशात पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे. अरबी समुद्रात नैऋत्य दिशेला 150 किलोमीटर लांब अंतरापासून हे ढग दाटलेले दिसत असल्यामुळे पावसाचा धडाका उद्याही राहील, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. हवामान खात्याने शनिवारी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीसह ‘ही’ २ राज्य वगळून आज देशभर शेतकऱ्यांचा चक्काजाम

News Desk

अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू !

News Desk

महाराष्ट्राचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारीत शहीद

News Desk