अमृतसर | अमृतसर येथे आज रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रावणदहन होत असताना पेटलेला पुतळा एका बाजूला झुकल्यामुळे तो उपस्थितांच्या अंगावर पडेल अशी भीती निर्माण झाली होती. दरम्यान, या अपघातातून वाचण्यासाठी उपस्थित लोकांनी घटनास्थळावरून आजूबाजूच्या परिसरात धाव घेतली. रावणदहन होत असलेल्या जागेच्या बाजूला रेल्वेचे रूळ असल्यामुळे घाईने धावत असलेले लोक रेल्वेच्या रुळांवर आले. भरधाव वेगाने येत असलेल्या रेल्वेने अचानक रुळावर असलेल्या लोकांच्या जमावाला धडक दिली. सदर घटनेत ५० हुन अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीची उपस्थिती
अमृतसरमध्ये आज झालेल्या अपघातावेळी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी देखील उपस्थित होती. सुदैवाने सिद्धू यांच्या पत्नीला कोणतीही इजा झालेली नाही.
पोलीस कमिशनर एस.एस.श्रीवास्तव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ५०ते ६०पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. अद्याप पोलिसांकडून मृतांचा स्पष्ट आकडा प्राप्त झालेला नाही.
#WATCH Amritsar accident: Police Commissioner SS Srivastava says, "Exact death toll is not known but it is definitely more than 50-60. We are still evacuating people." pic.twitter.com/5l9Gjw90VB
— ANI (@ANI) October 19, 2018
अमृतसर अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी केले दुःख व्यक्त
अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेमुळे अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातातील जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. यासाठी आवश्यक ते सहाय्य त्वरित देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Extremely saddened by the train accident in Amritsar. The tragedy is heart-wrenching. My deepest condolences to the families of those who lost their loved ones&I pray that the injured recover quickly. Have asked officials to provide immediate assistance that is required: PM pic.twitter.com/Omx1oyXjDs
— ANI (@ANI) October 19, 2018
पहा… कसा झाला अमृतसर मध्ये रेल्वे अपघात
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.