HW News Marathi
देश / विदेश

ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

मुंबई । ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. डिसले यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. रणजीतसिंह डिसले यांनी आपल्या WhatsApp स्टेटसमार्फत स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, नुकतीच रणजीतसिंह डिसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

“मला लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी”, असे आवाहन रणजितसिंह डिसले यांनी केले आहे. दरम्यान, डिसले पती-पत्नी दोघांचेही अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून इतर कुटुंबीयांची चाचणी नकारात्मक आल्याची माहिती मिळत आहे.

रणजितसिंह दिसले यांच्या नुकत्याच अनेक राजकीय नेत्यांशी भेटी झाल्या होत्या

रणजितसिंह दिसले यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या सर्व नेत्यांसोबत रणजितसिंह दिसले यांची गेल्या काही दिवसांमध्ये भेट झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती

News Desk

केरळच्या पुरग्रस्तांना आप’ची अर्थिक मदत

News Desk

Budget 2020 | कराच्या रचनेत बदल होण्याची शक्यता

swarit