नवी दिल्ली | १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीएकडून भाजपकडून भाजपचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची निवड करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का आहे. बिर्ला बुधवारी (१९ जून) लोकसभा अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला आहे.
Om Birla likely to be next Lok Sabha Speaker
Read @ANI story | https://t.co/zNOJZ5uEgT pic.twitter.com/GPLBs6IYzA
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2019
लोकसभा सभापतीपदासाठी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावे चर्चेत होती. परंतु ओम बिर्ला यांना सभापतीपद देण्यावर एनडीएमध्ये एकमत झाल्याचे समजते. खासदार होण्यापूर्वी बिर्ला हे कोटा दक्षिण येथून तीनवेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार राम नारायण मीणा यांचा २ लाख ७९ हजार मतांनी पराभव केला होता.
ओम बिर्ला यांचा अल्प परिचय
ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी झाला आहे. बिर्ला यांनी मास्टर ऑफ कॉमर्स ही पदवी घेतली असून बिर्लांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कॉलेजमध्ये विद्यार्थी युनियनमधून केली. भाजप युवा मोर्चाचे ते राजस्थानमधील अध्यक्ष होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ते उपाध्यक्ष झाले. २००३ मध्ये पहिल्यांदा बिर्ला कोटा दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. कोटा दक्षिण मतदारसंघातून ते ३ वेळा आमदार राहिले होते. सध्या कोटा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. ओम बिर्ला यांना पत्नी, दोन मुली असे कुटुंब आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.