HW News Marathi
देश / विदेश

देशामध्ये कोरोनामूळे मृत पावलेल्यांचा आकडा ७ वर

गुजरात | कोरोना व्हायरसमुळे भारतात बाधितांच्या आणि मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. आज (२२ मार्च) मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला तर गुजरातच्या सुरतमध्ये करोनाची लागण झालेल्या ६९ वर्षांच्या माणसाचाही मृत्यू झाल्याची माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामूळे कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा ७ वर गेला आहे. आजचा जनता कर्फ्यू हा आणकी दिवस जप सुरु ठेवला तर कदाचित बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात फरक पडू शकते.

दरम्यान, बिहारमध्येही कोरोनाचा पहिला बळी गेला असून ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणावर पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. वैद्यकीय तपासणीत तरुणाला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामूळेच त्याचा मृच्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत टप्याटप्याने वाढ होत आहे. पाटणामध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळवा असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ३४५ वर पोहोचला आहे. दरम्यान, हे जागतिक संकट लवकर दुर व्हावे यासाठी राज्य आणि केद्र सरकार अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आपण सहकार्य करायला हवे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सध्या २ मुख्यमंत्री, अजित पवारांना अपयशी ठरविण्याचे प्रयत्न सुरु !

News Desk

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna

हे सरकार इंग्रजांप्रमाणे काम करत आहे | हार्दिक पटेल

News Desk