HW News Marathi
देश / विदेश

शिमल्यात विक्रमी ७४ टक्के मतदान

शिमला- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत 50 लाख मतदारांनी मतदान केलं असून, 68 जागांवर उभे असलेल्या 337 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद झालं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगानं 399 मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित केलं होतं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन खराब झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. धूमल, वीरभद्र आणि अनुराग ठाकूर यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. तर धूमल यांनी 60हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

हिमाचल प्रदेशमधील मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत म्हणाले, धर्मशाळेत सर्वात जास्त 12, तर झंडुतामध्ये सर्वात कमी 2 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी 80 टक्के केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांना हिमाचल प्रदेशमध्ये तैनात करण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेतील एच-४ व्हिसाधारकांना मोठा धक्का

swarit

२०२१ चा केंद्रिय अर्थसंकल्प सादर करण्याआधी सरकारला ‘या’ बाबतीत मिळाला दिलासा!

News Desk

भाजपच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांच्या पत्राची दखल!

News Desk