HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये दहशतवादी-जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ८ नागरिकांचा मृत्यू

काश्मीर | काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यातील लर्रू परिसरात काल (२१ ऑक्टोबर)ला दशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. या चकमकीत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ५ जण जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलग्राम जिल्ह्यातील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कुलग्राममध्ये भारतीय लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार एका घरात दहशतवादी लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे भारतीय लष्करांनी ३ दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे.

या दहशदवाद्यांना ठार केल्यानंतर जमावाने लष्करावर दगडफेक केल्यानंतर देखील दहशतवादी लपलेल्या घरात घुसून त्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या दरम्यान त्या घरातील विस्फोटक फुटला. त्यामुळे ५ जणांचा जागीच ठार झाले. परंतु जवळपासचे ४३ पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कुलग्राम, श्रीनगर व अनंतनाग जिह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी न जाण्याची सुचना वळोवेळी देऊन देखील नागरिक दशतवादी लपलेल्या घरात घुसण्याच्या प्रयत्न करत असताना एका स्फोटकाचा धमाका झाला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश सिंह विजयी

swarit

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार

News Desk

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; हिमाचल प्रदेश, गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता

Aprna
देश / विदेश

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | “काँग्रेसकडून कधीही राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी उमेदवार करायचे आहे असे सांगण्यात आलेले नाही. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीने अशा प्रकारची चर्चा न करण्याचे देखील आवाहन केले होते.” असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी पी. चिदंबरम यांनी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजू स्पष्ट केली आहे.

केवळ राहुल गांधीच नव्हे तर इतर कोणाच्याही नावाची घोषणा केली जाणार नाही, असेही चिदंमबरम यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना आता अवघा काहीच महिन्यांचा अवधी राहिला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विशेषतः काँग्रेसकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेस भाजपला शह देण्याच्या प्रयत्नात आहेत.

गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्ष मजबूत झाल्याचे पी चिदंबरम यांनी मान्य केले आहे. “आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे. सुधारणावादी, व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणारे, कर दहशतीला थारा न देणार , महिला आणि मुलाबाळांची सुरक्षा ठेवणारे, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणारे सरकार आम्हाला हवे आहे.” असे यावेळी पी.चिदंबरम म्हणाले.

Related posts

काँग्रेसकडून ‘जंतर मंतर’ मैदानात आंदोलन, अधिवेशनात बऱ्याच अडचणी!

News Desk

गेल्या २८ दिवसांमध्ये देशातील १५ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

आधार क्रमांकाद्वारे पॅन क्रमांक मिळवणे होणार शक्य

swarit