HW News Marathi
देश / विदेश

जगातील सर्वांत उंच गावात दुष्काळ

कोमिकरस्तामार्गे जोडलेले जगातील सर्वात उंच गाव अर्थात हिमाचल प्रदेशातील कोमिक, इथे दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या गावातील जलस्रोत आटत असल्याने तेथील शेती आणि मानवी जीवन संकटात आले आहे.

नेपाळमधील धो तारप अथवा बोलिव्हिया येथील सांता बार्बरा ही गावे अतिशय उंचीवर आहेत. मात्र, हिमाचल प्रदेशातील कोमिक गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते उर्वरित देशाशी रस्तामार्गे जोडले आहे. हे गाव तब्बल चार हजार ५८७ मीटर (१५ हजार ५० फूट) उंचीवर आहे. एवढ्या दुर्गम भागात वसलेल्या या गावात केवळ १३० ग्रामस्थ आहेत. हिवाळ्यात या गावात पारा शून्याखाली घसरतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या गावाला तापमानवाढीचा मोठा फटका बसत आहे.

या गावात सातू आणि हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणावर पिकतो. परंतु त्यासाठी आवश्यक पाणी मिळेनासे झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात होणारा हिमवर्षाव या शेतीसाठी फायदेशीर असतो. या हिमवर्षावामुळे नदी, ओढे, तळी सुजलाम होऊन वाहू लागतात. गेल्या काही वर्षांपासून पुरेसा हिमवर्षाव होत नसल्याने येथील स्पिती नदी, ओढे, तळी आटल्याचे भयावह चित्र दिसत आहे. स्पितीचे पाणी कालव्यामार्गे तळ्यात आणून त्याच्या आधारे शेती करण्याचे तंत्र येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून आत्मसात केले आहे. मात्र हिमवर्षावातच घट झाल्याने उपलब्ध जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत.

आम्हाला या दुर्गम भागात राहण्याची आता सवय झाली आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीने जगतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्र बदलताना दिसत आहे. पाण्याचे एवढे कमी प्रमाण आम्ही कधीही पाहिले नव्हते. यामुळे आमची शेती व जगणेच धोक्यात आले आहे, अशी व्यथा नवांग फुन्चोक या ३२ वर्षीय शेतकऱ्याने मांडली. रस्त्याने जोडलेले असल्याने पर्यटन व व्यापाराच्या माध्यमातून आमच्या गावात सुबत्ता येईल, अशी आशा होती. मात्र तसे काहीच न घडल्याने आम्ही निराश झालो आहोत, अशी प्रतिक्रिया तेन्झिन आंदक या ५५ वर्षीय शेतकऱ्याने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेने जवानांना ‘अशी’ केली मदत

News Desk

कुलभूषण जाधव प्रकरणी आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

News Desk

“२०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता हे कुणाचं नशीब ?” नवाब मलिक

News Desk