HW News Marathi
Covid-19

अमेरिकेत कोरोनाचे ९ लाख ५४ हजार १८२ रुग्ण आढळले, तर वुहानमधील सर्व रुग्णांना रुग्णालयामधून डिस्चार्ज

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा थैमान घातला आहे. कोरोनामुळे अमेरिका, इटली आणि स्पेन देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळून आली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने काल (२६ एप्रिल) रात्री उशिरा दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत १ हजार ३३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ९ लाख ५४ हजार १८२ रुग्ण आढळले असून ५४ हजार ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील काही कोलोराडो, मिसिसिपी, मिनासोटा आणि टेनेसी या राज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत लॉकडाऊन संपवण्याचे जाहीर केले आहे. जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या दोन लाखाच्या पुढे गेला आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

अमेरिकेनंतर कोरोनानं इटलीत सर्वाधिक बळी घेतले आहेत. मात्र, आतापर्यंत इटलीमध्ये २६ हजार ६४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीत सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. काल इटलीत ४१५ जणांचा मृत्यू झाला होता. इटलीत १४ मार्चनंतर सर्वांत कमी मृत्यू झाल्याची माहिती नागरिक सुरक्षा सस्थेने दिली आहे. तसेच इराणमध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्या ठिकाणच्या मशिदी सुरू करण्याचा विचार इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी काल यासंबंधी वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या वेबसाईटनुसार, इराणला व्हाईट, येलो आणि रेड अशा तीन भागांत विभागले जाणार आहे. आणि मग त्यानंतर या विभागांत काही नियम लागू केले जाती, अशीही माहिती दिली आहे. इराणमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९०, ४८१ वर पोहोचली आहे आणि आतापर्यंत ५ हजार ७१० जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या वुहान प्रातांती सर्व कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

तर दुसऱ्या बाजुला कोरोनाचा उगम झालेल्या चीनमधील वुहान प्रातांत कोरोना रुग्णांचा संसर्ग झालेल्या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आता रुग्णालयात नाही, सरकारने सगळ्यांना डिस्चार्ज केले आहे,” असे चीनच्या हेल्थ कमिशनचे प्रवक्ते मी फेंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, चीनमध्ये २६ एप्रिलला कोरोनाचे फक्त ३ नवीन रुग्ण आढळले असून कुणाचाही मृत्यू झालेला नाही. २५ एप्रिलला कोरोनाचे ११ रुग्ण आढळले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट

News Desk

नव्या सरकारी योजनांबाबत केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय 

News Desk

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावर राष्ट्रवादी भडकली !

News Desk