केंद्रपाडा | ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातील महानदीत बोट उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून ९ जण बेपत्ता आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दहा जण सहलीला गेले होते. सहलीवरून परताना महानदीत बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून ९ जण बेपत्ता झाले आहेत. तसेच यामध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. बोटीतील सर्वजण जगतसिंहपुर जिल्ह्यातून आले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
#UPDATE: Odisha CM announces ex gratia of Rs 4 lakh each for kin of deceased & free treatment for the injured in Kendrapara boat capsize https://t.co/FlEuZIOqcS
— ANI (@ANI) January 2, 2019
One dead and nine missing after a boat capsized in a river in Kendrapara district of #Odisha
— ANI (@ANI) January 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.