बंगळूरू | अवघ्या काही दिवसावर कर्नाटक विधानसभा येऊन ठेवलेल्या आहेत. कर्नाटमध्ये एका फ्लॅटमधून तब्बल ९ हजार ७४६ बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहे. हा सर्वप्रकारात आर. आर. नगर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना नायडू यांचा हात असल्याचा आरोप भाजपा नेते सदानंद गौडा यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगितले.
या प्रकारवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाला नव्या वादाला तोड फुटले आहे. भाजप नाटक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच ज्या फ्लॅटमधून ही ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तो फ्लॅट मंजुळा नांजामुरी यांच्या नावे असून, ते भाजपाचे नेते असल्याचा आरोप सुरजेवाल यांनी केला. मात्र भाजपने तातडीने हा आरोप फेटाळून मंजुळा नांजमुरी यांनी सहा वर्षांपूर्वीच भाजप सोडल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला आहे
Manjula Nanjamuri has nothing to do with BJP. She left BJP six years ago. Manjula is a Congress person now. They just want to blame BJP without any substance. We have proof of various things, which we will present before the EC: Prakash Javadekar, Union Minister. pic.twitter.com/ApXbRoDvyM
— ANI (@ANI) May 8, 2018
“फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेली ९ हजार ७४६ मतदार ओळखपत्रे पहिल्या नजरेत खरी वाटत आहे. ही ओळखपत्रे एका छोट्या पाकीटात ठेवण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर नाव पत्ता लिहिलेला आहे. या प्रकरणी दोषींवर योग्यवेळी योग्य कारवाई केली जाईल. बंगळुरूचे आयुक्त आणि अन्य तीन निरीक्षकांना तपासासाठी पाठवण्यात आले आहे. येत्या २४ तासात या प्रकाराविषयीचे सत्य समोर येईल त्याआधारे आम्ही योग्य निर्णय घेऊ.” असे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार म्हणाले.
FIR has been registered & further investigations will be conducted. The situation is being closely monitored by the Election Commission & appropriate action will be taken: Sanjeev Kumar, Chief Electoral Officer for #Karnataka pic.twitter.com/Q5o5zrqz6z
— ANI (@ANI) May 8, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.