HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विनोद दुआ यांच्यासोबत काम केलेल्या HW न्यूजच्या पत्रकाराने जागवल्या त्यांच्या आठवणी

News Desk

दिल्लीत ‘मरकज’ची यात्रा घडली नसती, तर धर्मावर काय मोठे आकाश कोसळले असते?, सामनातून टीका

swarit

राज्यातील पूरस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

सुशांतच्या मृतदेहाचे फोटोज व्हायरल, महाराष्ट्र सायबर सेलचा कडक इशारा

News Desk

प्रेमात अडचण ठरल्याने प्रेयसीच्या मुलीची हत्या

News Desk

लोकसभा निवडणूक वेळेवरच, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

News Desk