मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ९८५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर देशात २७९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आता कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ५८३ वर गेली आहे. तर आतापर्यंत देशात ७ हजार ७४५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १ लाख ३३ हजार ६३२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १ लाख ३५ हजार २०६ जण उपचारानंतर बरे झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
9985 new #COVID19 cases & 279 deaths reported in the last 24 hours. Total number of cases in the country now at 276583, including 133632 active cases, 135206 cured/discharged/migrated and 7745 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/lFw0MwKvYp
— ANI (@ANI) June 10, 2020
देशात महराष्ट्रात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रासह देशात अजून चार राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ वर गेली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे. तामिळनाडूत ३४०१४ रुग्ण आहेत. तिथे आतापर्यंत ३०७ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राजधानी दिल्लीचा क्रमांक येतो. दिल्लीत कोरोनाची एकूण संख्या ३१, ३०९ इतकी आहे. यापैकी ९०५ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच गुजरातमध्ये २१ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. यापैकी १३१३ जणांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशात ११,३३५ इतके रुग्ण आढळलेत. यातील ३०१ जणांचा मृत्यू झालाय. राजस्थानमध्ये ११,२४५ इतके रुग्ण आढळले. त्यापैकी २५५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.