HW News Marathi
देश / विदेश

बसला अपघात, आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू

श्रीनगर | जम्मू-श्रीनगर महामार्गाजवळील रामबन जिल्ह्यात खूनी नाला येथे आयटीबीपीच्या (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस) जवानांची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकूण २४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीबीपीच्या जवानांच्या या बसमध्ये एकूण ३५ जण प्रवास करत होते. या बस अपघातात जखमी झालेल्या आयटीबीपीच्या जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला दूर ठेवून नवीन आघाडी होणे शक्य नाही! – संजय राऊत

News Desk

पुलवामा हल्ला केवळ मतांसाठी घडवून आणला होता !

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna