HW News Marathi
देश / विदेश

ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठीची शिक्षणाची मर्यादा शिथिल

नवी दिल्ली | देशात ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठी आता असलेली शिक्षणाची मर्यादा आता शिथिल करण्यात आला आहे. देशात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सध्या तब्बल २२ लाखांहूनही अधिक ड्रॉयव्हर्सची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठी आठवी पास असण्याचा नियम शिथिल करत यापुढे कोणतीही त्यापेक्षा कमी शिकलेली किंवा अशिक्षित व्यक्ती देखील ड्रायव्हींग लायसन्स काढू शकणार आहे. स्वतः नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

दळणवळण मंत्रालयाकडून केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ कायद्यात सुधारणा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक होते. मात्र, ही अट रद्द करण्यात आली असून आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी कोणतीही शिक्षणाची अट असणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, देशातील वाहतूक क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे, आमची नाही !

News Desk

काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit