HW News Marathi
देश / विदेश राजकारण

धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कुणाचा?, निवडणूक आयोगासमोर आज होणार सुनावणी

मुंबई | निवडणूक आयोगासमोर (Election Commission of India) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचे (Dhanushyaban) चिन्ह कुणाचे यावर आज सुनावणी होणार आहे. आयोगासमोर आज (20 जानेवारी) दुपारी 3 वाजता होणाऱ्या सुनावणीदरम्यान निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण नेमके कोणला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी आयोगासमोर 17 जानेवारी सुनावणी पार पडली होती.

 

तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत केलेल्या बंडानंतर शिवसेनेचा पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह तातपुर्ते गोठविले होते. यानंतर ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले. यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मुळ चिन्हावर ठाकरे गट आणि शिंदे गटाने दावा केला आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपुष्टात येत आहे. यामुळे ठाकरे गटाने प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी आयोगाकडे मागितली आहेत. यावर आयोगा आज होणार सुनावणीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

यापूर्वी निवडणूक आयोगामध्ये नेमके काय झाले

 

यापूर्वी आयोगाने झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रांची त्यांच्याकडून पूर्तता करण्यात आली होती. या कागदपत्रातील कोणत्याही व्यक्तीला आयोगासमोर बोलवावे आणि त्यांची ओळखपरेड आणि छाननी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने आयोगाकडे केली होती. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रांची देखील छाननी करण्यात यावी, असेही मागणी ठाकरे गटाने केली. तसेच आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट या दोनन्ही गटाकडून कागदपत्रे जमा करण्यात आली होती. यात ठाकरे गटाचे 23 लाख आणि शिंदे गटाचे चार लाख कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर म्हटले की, शिंदे गटाने जमा केलेल्या कागदपत्रात काही त्रुटी असल्याचा दावा केला होता. परंतु, कपिल सिब्बल यांच्या दाव्यावर शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी आक्षेप घेत म्हणाले, शिंदे गटाने जमा केलेल्या कादपत्रात कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा त्यांनी आयोगासमोर केला.

संबंधित बातम्या

शिवसेना आणि धनुष्यबाणावर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक!

Aprna

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार का ?

News Desk

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Aprna