HW News Marathi
देश / विदेश

खुशखबर ! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर आज (१ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची बाजारातील किंमत आता ५७४.४० रुपये असेल. यापूर्वी जुलैमध्ये विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर १००.५० रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलेंडरमध्ये १६३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्याने सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षाला एलपीजी १४.२ किलोचे १२ घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात. व्यवसायिक दुकानदारांना १९ किलोचे सिलेंडर १०९५ रूपायाला मिळेल. १२६ रूपयांनी या महिन्यात गॅसच्या दरात कपात झाली आहे. मागील दोन महिन्यात व्यवसायिक गॅस दरात ३०८.५० रूपयांनी कपात करण्यात आली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोची शिपयार्डमध्ये ओएनजीसीच्या ‘सागर भूषण जहाजावर भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

News Desk

इस्राईलमध्ये हवाई हल्ल्यात अल-अक्सा टीव्हीची इमारत उध्वस्त

swarit

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम

News Desk